GuidePedia




१ रुपयात पिक विमा- सर्वसमावेशक पिक विमा योजना-प्रधानमंत्री पीक विमा योजना- खरीप 2023

तपशील
 
1.  या योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत –

सन 2023-24 पासून शेतकरी यांना केवळ १ रु. भरुन पिक विमा काढता येईल.
ही योजना कर्जदार व  बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छीक स्वरुपाची आहे.
खातेदारा व्यतिरीक्त कुळाने अगर भादेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेत सहभागी होवू शकतात.
या योजनेत नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगांमुळे  पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण मिळते. 
ही योजना राबविण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांचे १२ समूह करण्यात आहेत. या जिल्ह्यांच्या समूहासाठी एक विमा कंपनी नेमण्यात  आलेली आहे. 
या वर्षापासून या योजने मध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे  तो म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना ही या वर्षी कप अँड कॅप मॉडेल (८०:११०) नुसार राबविण्यात येणार आहे. यामध्ये एकूण जमा विमा हप्त्याच्या २० टक्के पेक्षा जास्त रक्कम विमा कंपन्यांना स्वतःकडे ठेवता येणार नाही. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिल्यानंतर उरलेली २० टक्के पेक्षा जास्तीची रक्कम विमा कंपनी राज्य शासनाला परत करेल. तसेच  विमा कंपनी एका वर्षामध्ये जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या ११० टक्केपर्यंतचेच दायित्व स्वीकारणार आहेत. त्यापेक्षा जास्तीचा भार राज्य शासन स्वीकारणार आहे. म्हणजे विमा कंपनी त्यांचेकडे जमा विमा हप्त्याच्या जास्तीत जास्त ११० टक्के पर्यंतच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देईल.त्यापेक्षा जास्त असणारी  नुकसान भरपाईची रक्कम राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येईल. 
 

उदाहरणार्थ

१. विमा कंपनीकडे एका वर्षामध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम १०० कोटी रुपये आहे. आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले व नुकसान भरपाईची रक्कम ७५ कोटी असेल तर ७५ कोटी रुपये विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येतील.  कंपनी स्वतःकड़े २० कोटी रुपये ठेवेल आणि उरलेले ५ कोटी रु. राज्य शासनाला परत करेल. 
२.   विमा कंपनीकडे एका वर्षामध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम १०० कोटी रुपये आहे. आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले व नुकसान भरपाईची रक्कम ९५  कोटी असेल तर ९५  कोटी रुपये विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येतील.  कंपनी स्वतःकड़े ५ कोटी रुपये ठेवेल. 
३. विमा कंपनीकडे एका वर्षामध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम १०० कोटी रुपये आहे. आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले व नुकसान भरपाईची रक्कम ११५  कोटी असेल तर ११० कोटी रुपये विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येतील.उरलेले ५ कोटी रु.ची नुकसान भरपाईची रक्कम राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येईल. 


नवीन विहिरीसाठी तब्बल 2 लाख 50 हजार इतके अनुदान मिळणार.


पिक विमा कोणत्या पिकांसाठी लागू आहे

खरीप हंगाम- 

भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तुर, मका, भुईमूग, कारळे, तिळ, सुर्यफूल,

सोयाबीन, कापूस, कांदा.


रबी हंगाम-

गहू (बागायत), रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, रबी कांदा. 


या योजने मध्ये जोखमीच्या बाबी कोणत्या आहेत किंवा पिकांचे कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या वेळी नुकसान झाले तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते -  

 i) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान*- 

ii) *हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे झालेले नुकसान*-

iii) हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चीत करणे). 

iv)  *स्थानिक नैसर्गिक आपत्तिमुळे होणारे नुकसान*-(वैयक्तीक स्तरावर) -

v) *नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान* - ( वैयक्तीक स्तरावर) -


४.आवश्यक कागदपत्रे- 

7/12, आधार कार्ड,बँक पासबूक प्रत, पिकाची पेरणी बाबत स्वयंघोषना पत्र,

भाडेपट्टा करार असल्यास करारनामा / सहमतिपत्र.   


५. योजनेचा हप्ता कुठे भरावा- 

आपले सरकार सेवा केंद्र (csc), बँक, प्राथमिक कृषी पत पूरवठा सहकारी संस्था,

तसेच www.pmfby.gov.in या वेब साईट वर ऑनलाईन पद्धतीने.                       


६. विमा हप्ता किती भरावा लागेल (प्रती हेक्टर)-

सन 2023-24 पासून शेतकरी यांना केवळ १ रु. भरुन पिक विमा काढता येईल.


7. योजनेत सहभागी होण्यासाठी अंतीम तारीख खरीप पिकांसाठी कोणती आहे ?

योजनेत सहभागी होण्यासाठी अंतीम तारीख रबी पिकांसाठी कोणती आहे ?

रबी ज्वारी- ३० नोव्हेंबर

गहू बागायत, हरभरा, कांदा - १० डिसेंबर

उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग- ३० मार्च

वरील तारखा या २०२३, २०२४, व २०२५ या तिन्ही वर्षासाठी आहेत. 


आवश्यक कागदपत्रे


 
Top