शेती करताना सर्वात जास्त आणि महत्वाची गरज असते ती पाण्याची. यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची साठवणूक (Subsidy) करण्यासाठी विहीर खांदणे गरजेचे आहे. परंतु यासाठी मोठ्या प्रमाणात (Financial) आर्थिक भांडवल लागते.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
• नवीन विहिरीसाठी सक्षम प्राधिकारीकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अनिवार्य
• 7/12 व 8-अ चा उतारा आवश्यक
• वार्षिक उत्पन्नाचा दाखला
• लाभार्थी अपंग असल्यास त्याचा पुरावा (प्रमाणपत्र).
• शेतजमिनीचा दाखला आणि विहीर नसल्याचे प्रमाणपत्र.
• विहीर असल्यास विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
• त्याचबरोबर भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला असणे आवश्यक.
• कृषि अधिकारची क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र असणे आवश्यक.
• गट विकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र व जागेचा फोटो अनिवार्य.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana) सरकारने आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान (Subsidy) मिळते. आता नवीन विहिरीसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे.
डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना
डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना Mahadbt Farmer Scheme Portal वर अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे सोडून राज्यामधील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी तब्बल 2 लाख 50 हजार इतके मिळते. या अनुदानासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना सध्या पात्र झाल्याचे मेसेज येत आहेत.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
• या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सदर व्यक्ती अनुसूचित SC जाती प्रवर्गातील असणे आवश्यक.
• सदर व्यक्तीने जातीचा दाखला जोडणे बंधनकारक.
• सदर व्यक्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही दीड लाखापर्यंतच असणे आवश्यक.
• जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करावा.
• त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखलाही सादर करणे आवश्यक.
• या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे 0.20 हेक्टर ते 6 हेक्टरपर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे अनिवार्य आहे.