GuidePedia

 

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Annasaheb Patil Loan Document List


ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
  • मराठा जातीचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
  • प्रकल्प अहवाल (नसेल तर आमच्याकडे भेटेल.)

बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • वीज बिल
  • उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • सिबिल रिपोर्ट
  • व्यवसाय-प्रकल्प अहवाल
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • बँक कर्ज मंजुरी पत्र
  • बँक स्टेटमेंट
  • उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • व्यवसायाचा फोटो
१.     वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

        ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना १5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते तसेच लाभार्थ्याने कर्जाचे हफ्ते वेळेत भरल्यास त्या हफ्त्याच्या व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साहाय्याने जमा करण्यात येते.

या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी ४ टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो.

२.    गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत    

१० लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते व कर्जाचा परतफेड कालावधी ५ वर्षासाठी निर्धारित केले गेलेला आहे.या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांच्या बचत गट,भागीदारी संस्था,सहकारी संस्था,कंपनी,LLP FPO अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची वैशिष्ट्ये

Annasaheb Patil Loan Scheme Features

  • ही योजना महाराष्ट्र सरकार ने सुरु केली आहे
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणत्याची श्रेणीचा उमेदवार अर्ज करून लाभ प्राप्त करू शकतो.
  • या योजनेला ऑनलाईन करण्यात आले आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज  नाही अर्जदार घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या साहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराचा वेळ व पैसे यांची बचत होते.
  • या योजनेअंतर्गत अर्जदार अर्ज केल्यापासून ते कर्ज मिळेपर्यंत अर्जाची स्थिती आपल्या मोबाईल च्या माध्यमातून वेळोवेळी बघू शकतो.
  • या योजनेला ऑनलाईन केले गेले असल्यामुळे या योजनेत पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होते व योग्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत कर्ज पुरविले जाते.

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्रता

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Loan Scheme Eligibility

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरिता जास्तीत जास्त 50 वर्षे तर महिलांकरिता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल.

 
Top