GuidePedia


आवश्यक कागदपत्रे
  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. कंपनी लेटर (असेल तर)
  5. अर्जदाराचा फोटो
  6. सही

 नोकरभरती तसेच विविध कामानिमित्ताने लागणाऱ्या



च्या दाखल्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा सुरु झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. परंतु आजही अनेकांना याबद्दल माहिती नसल्याने निरर्थक त्रास सहन करत असतात. निमशासकीय, खाजगी संस्था इ. मध्ये नोकरीकरिता वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे अत्यंत गरजेचे असते.


चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रास मंजुरी कशी मिळते?


चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर सदर अर्ज आपल्या लोकल पोलीस स्टेशन मध्ये ते जाते. त्या ठिकाणी अर्जदाराने भरलेला फॉर्म त्याला जोडलेले कागदपत्रे याची पडताळणी केली जाते. आणि तसेच सदर इसमावर काही गुन्हा दाखल झाले आहेत की नाही याची शहानिशा केली जाते. त्यानंतर सदर अर्ज संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात जाते. त्यानंतर आपल्या अर्जाची त्या ठिकाणी पुनर पडताळणी होऊन सर्व योग्य असल्यास आपल्या अर्जास मंजुरी मिळते आणि आपल्याला चारित्र्य पडताळणी दाखला मिळते.

चारित्र्य पडताळणी दाखला केव्हा मिळत नाही व का मिळत नाही?


अर्जदाराने चारित्र्य पडताळणी प्रमाण पत्रासाठी ज्यावेळी अर्ज करतात त्यावेळी अर्जामध्ये योग्य माहिती भरावी लागते. फॉर्म भरताना काही चुका झाल्यास किंवा चुकीची कागदपत्रे सोडल्यास अशावेळी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हा मिळत नाही.









 
Top