GuidePedia


मागासवर्गीयांसाठी थेट कर्ज योजना 2023 सुरू झालेली असून यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांना व्यवसायासाठी एक लाखापर्यंत कर्ज देणाऱ्या थेट कर्ज योजनासंदर्भात सविस्तर माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.


थेट कर्ज योजना महाराष्ट्र 2023

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील प्रवर्गाच्या तरुणांना छोटा मोठा उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. या प्रवर्गातील लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे अशा युवकांना व्यवसायासाठी मदत केल्यास चांगला हातभार होऊन भविष्यात त्यांचा विकास होईल. या अनुषंगाने थेट कर्ज योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येत.

            तुम्ही वाचक अनुसूचित जात प्रवर्गातील असाल किंवा तुमच्या संपर्कातील मित्र-मैत्रिणी अनुसूचित जात प्रवर्गातील असतील, तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी युवकांना कर्ज मिळणार असून यासाठी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत 10 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे, त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.

अनुसूचित जातीसाठी कर्ज योजना

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील अनुसूचित प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध अशा योजना राबविण्यात येतात. यामधीलच एक महत्त्वाचा विषय म्हणजे थेट कर्ज योजना होय. मुंबई शहर व उपनगरातील अनुसूचित जातीअंतर्गत येणाऱ्या मातंग पोटजातीतील अर्जदारांनी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अनेक प्रकार येतात यामधील मांग, मातंग, मिनी मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमां, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी मादगी या 12 पोटजातीमध्ये येणारी तरुण युवक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.


कर्ज किती मिळणार ?

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनाअंतर्गत पात्र युवकांना सुरुवातीला 95,000 रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यामध्ये महामंडळाचा सहभाग रू. 85,000 इतका असेल आणि अनुदान 5,000 रू. आणि उर्वरित 5,000 रू.चा सहभाग अर्जदाराचा असेल. ज्याचा उपयोग तरुण त्यांचा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी करू शकतील.


अर्ज कसा व कुठे करावा ?

अर्जदारांना अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील कार्यालयास भेट द्यावी लागेल. सदरच्या लेखातून आपण मुंबई शहर व उपनगरातील अनुसूचित जातीमधील अर्जदारांसाठी चालू असलेल्या योजना बद्दलची माहिती पाहत आहोत, त्यामुळे त्यांनी खाली देण्यात आलेल्या पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा.


जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला

अर्जदारांना या योजनेसंदर्भात या संदर्भात अधिकची माहिती हवी असेल, तर त्यांनी 022-26591124 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा rmslasdcbandra@gmail.com या ई-मेल अर्जदार संपर्क साधू शकतात.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top